एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,धुळे येथील सहायक प्रकल्प अधिकारी श्री एस. टी . वाडीले साहेबांनी दिनांक २६ सप्टेंबर २०१७ रोजी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा ,निमझरी शाळेस भेट दिली. आपल्या सविस्तर भेटीत त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी हितगुज केले. शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. शाळेच्या कामकाजाविषयी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी त्यांनी समाधान केले. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी भावी यशासाठी शुभेच्छा दिल्यात आणि यशाची परंपरा निरंतर चालू ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापक [माध्यमिक ] श्री पी .डी .पावरा व मुख्याध्यापक [प्राथमिक] श्री आर.एस. कुलकर्णी यांनी माननीय अधिकारी महोदयांचे स्वागत केले .
"विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास'' हेच आमचे ध्येय ! या उद्देशानेच सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत दर्जेदार शिक्षणाचे दालन उपलब्ध व्हावे म्हणून १९९७ मध्ये निमझरी येथे माध्यमिक तर 2014 मध्ये उच्च माध्यमिक आश्रमशाळेची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून शाळेची आततागायत यशस्वी घौडदौड सुरु असून असंख्य विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यात आपला महत्वाचा वाटा शाळेनं उचललेला आहे.
Saturday, September 30, 2017
Thursday, September 28, 2017
. निमझरी येथे ''हस्तकला'' व विविध नित्यपयोगी वस्तूंची निर्मिती'' प्रशिक्षण संपन्न !
दिनांक २८ सप्टेंबर २०१७ रोजी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा ,निमझरी येथे आज अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ''हस्तकला'' व विविध नित्यपयोगी वस्तूंची निर्मिती'' प्रशिक्षण " संपन्न झाले . एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे आणि ''आदिवासी सामाजिक विकास संस्था'' जव्हार यांचे संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला . जव्हार येथील ''आदिवासी सामाजिक विकास संस्थेच्या'' श्रीमती संगीता गुरव , कुमारी रश्मी मोरे व श्री हेमंत चौधरी यांनी इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले . या प्रशिक्षणात त्यांनी अगरबत्ती बनविणे , साबण बनविणे , सुगंधी द्रव्य निर्मिती, हॅन्ड वाश लिक्विड निर्मिती , खडू बनविणे , पेपर बॅग निर्मिती आदी बाबतीत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक कृतीत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी दिली . विद्यार्थ्यांनी स्वावलंबी ,आत्मनिर्भर व्हावे या उद्देशाने सदरहू संस्था कार्यरत असून धुळे प्रकल्पातील व राज्यातील इतर प्रकल्पातील सर्व आश्रमशाळांमध्ये ते हा उपक्रम राबवित आहेत.
प्रारंभी श्री जे .व्ही .गिरासे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांनी विविध कलागुण जोपासून आत्मनिर्भर होणेसाठी अशा उपक्रमापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री रितेश कुलकर्णी यांनी भूषविले . कार्यक्रमास उपशिक्षक श्री एस.एम. भलकार ,श्रीमती माधुरी गावित ,श्री जे.बी. मिस्तरी ,श्री प्रमोद निळे ,श्री एच .बी .साळवे , श्री वाघ , श्री चौधरी ,श्री गोकुळ थोरात ,श्री आर .बी . जाधव ,श्रीमती भावना पाटील ,श्री मनोज महाले ,श्री जी एम पाटील ,श्री जे .डी .जाधव ,श्री डी एस पावरा उपस्थित होते. प्रशिक्षण यशस्वी करणेसाठी श्री प्रमोद पाटील ,श्री बोरसे, श्री मधुकर मोरे ,श्री रमेश भिल यांनी परिश्रम घेतलेत .
प्रशिक्षणाचे अन्य फोटो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
Wednesday, September 27, 2017
Friday, September 22, 2017
आद्य क्रांतिवीर शूरवीर उमाजी नाईक जयंती साजरी
आद्य क्रांतिवीर शूरवीर उमाजी नाईक जयंती च्या दिवशी आश्रम शाळा, निमझरी येथे प्रतिमा पूजन आणि व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री जयपालसिंह गिरासे यांनी क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा जीवनपट विद्यार्थ्यांपुढे मांडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री प्रल्हाद पावरा होते. प्रास्ताविक श्री चौधरी यांनी केले ,सूत्रसंचालन श्री प्रवीण भोई यांनी तर कुमारी माधुरी गावित यांनी आभार प्रदर्शन केले.
.आर सी पटेल अनुदानित व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर ,निमझरी येथे क्षेत्रभेट !
आज दिनांक २९ जुलै २०१७ वार-शनिवार रोजी आर सी पटेल अनुदानित व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर ,निमझरी येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले . आरंभी उपशिक्षक श्री जे.व्ही. गिरासे यांनी विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीचे स्वरूप आणि महत्व विशद केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री पी. डी. पावरा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. उपशिक्षक श्री भलकार ,श्री चौधरी ,श्री राहसे ,श्री मिस्तरी,श्री निकुंभ,श्री भोई ,श्री वाघ ,श्रीमती गावित ,श्री निळे व श्री निळं यांचे मार्गदर्शनाखाली सदर क्षेत्रभेटीचे यशस्वी आयोजन संपन्न झाले. या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांनी स्थानिक पुजारी ,मंदिर समितीचे प्रमुख यांच्याशी चर्चा करून मंदिराचा इतिहास, बांधकामाचे स्वरूप, नित्यक्रम, वार्षिक उत्सव इ. माहिती प्राप्त केली. हरिपाठ तसेच वारकरी संप्रदाय विषयी विद्यार्थी मोठ्या उत्कंठतेने माहिती जाणून घेत होते.
आदिवासी गौरव दिन व ऑगस्ट क्रांतिदिन साजरा
आर.सी.पटेल अनुदानित प्राथमिक ,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा ,निमझरी ता:शिरपूर येथे ९ ऑगस्ट २०१७ रोजी ''विश्व आदिवासी गौरव दिन'' व ''क्रांतिदिन'' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निमित्ताने प्रतिमा पूजन ,प्रभातफेरी , चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व व गायन स्पर्धा इ.इत्यादी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते . जाहीर कार्यक्रमात शाळेचे उपशिक्षक श्री जयपालसिंह गिरासे , श्री दिलवरसिंह पावरा , श्री भीमसिंह राहसे,श्री प्रवीण भोई यांनी आपल्या भाषणातून आदिवासी संस्कृती ,इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदानावर माहिती दिली . या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री रितेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री प्रल्हाद पावरा समारोहाच्या अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक श्री पावरा यांनी विद्यार्थ्यांना आपल्या श्रेष्ठ पूर्वजांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन देशसेवा आणि समाजसेवा करण्यासाठी वाहून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे उपशिक्षक श्री चौधरी, श्री ए.पी.वाघ ,श्री निळे, श्री जे.बी .मिस्तरी, श्री सावळे सर , श्रीमती माधुरी गावित , श्रीमती भावना पाटील , श्री सुनील निकुंभ , श्री आर.बी.जाधव, श्री जी.एम.पाटील, श्री जे.डी.जाधव ,श्री गोकुळ थोरात ,श्री मनोज महाले ,श्री प्रमोद पाटील, श्री रमेश भिल, श्री सुरेश पाटील, श्री बोरसे, श्री प्रदीप गुजर ,श्री मधुकर मोरे यांनी परिश्रम घेतलेत.
Subscribe to:
Posts (Atom)

-
अनुदानित प्राथमिक , माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्री जयंती निमित्त ...
-
आज दिनांक २९ जुलै २०१७ वार-शनिवार रोजी आर सी पटेल अनुदानित व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर ,न...
-
आद्य क्रांतिवीर शूरवीर उमाजी नाईक जयंती च्या दिवशी आश्रम शाळा, निमझरी येथे प्रतिमा पूजन आणि व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील जेष...