आर.सी.पटेल अनुदानित प्राथमिक ,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा ,निमझरी ता:शिरपूर येथे ९ ऑगस्ट २०१७ रोजी ''विश्व आदिवासी गौरव दिन'' व ''क्रांतिदिन'' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निमित्ताने प्रतिमा पूजन ,प्रभातफेरी , चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व व गायन स्पर्धा इ.इत्यादी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते . जाहीर कार्यक्रमात शाळेचे उपशिक्षक श्री जयपालसिंह गिरासे , श्री दिलवरसिंह पावरा , श्री भीमसिंह राहसे,श्री प्रवीण भोई यांनी आपल्या भाषणातून आदिवासी संस्कृती ,इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदानावर माहिती दिली . या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री रितेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री प्रल्हाद पावरा समारोहाच्या अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक श्री पावरा यांनी विद्यार्थ्यांना आपल्या श्रेष्ठ पूर्वजांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन देशसेवा आणि समाजसेवा करण्यासाठी वाहून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे उपशिक्षक श्री चौधरी, श्री ए.पी.वाघ ,श्री निळे, श्री जे.बी .मिस्तरी, श्री सावळे सर , श्रीमती माधुरी गावित , श्रीमती भावना पाटील , श्री सुनील निकुंभ , श्री आर.बी.जाधव, श्री जी.एम.पाटील, श्री जे.डी.जाधव ,श्री गोकुळ थोरात ,श्री मनोज महाले ,श्री प्रमोद पाटील, श्री रमेश भिल, श्री सुरेश पाटील, श्री बोरसे, श्री प्रदीप गुजर ,श्री मधुकर मोरे यांनी परिश्रम घेतलेत.
"विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास'' हेच आमचे ध्येय ! या उद्देशानेच सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत दर्जेदार शिक्षणाचे दालन उपलब्ध व्हावे म्हणून १९९७ मध्ये निमझरी येथे माध्यमिक तर 2014 मध्ये उच्च माध्यमिक आश्रमशाळेची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून शाळेची आततागायत यशस्वी घौडदौड सुरु असून असंख्य विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यात आपला महत्वाचा वाटा शाळेनं उचललेला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

-
अनुदानित प्राथमिक , माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्री जयंती निमित्त ...
-
आज दिनांक २९ जुलै २०१७ वार-शनिवार रोजी आर सी पटेल अनुदानित व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर ,न...
-
आद्य क्रांतिवीर शूरवीर उमाजी नाईक जयंती च्या दिवशी आश्रम शाळा, निमझरी येथे प्रतिमा पूजन आणि व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील जेष...
No comments:
Post a Comment