Monday, October 2, 2017

निमझरी येथे गांधीजी आणि शास्त्रीजींना अभिवादन !

अनुदानित प्राथमिक , माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्री जयंती निमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या प्रसंगी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री प्रल्हाद पावरा यांनी अध्यक्ष स्थान भूषविले. आज लहान गट आणि मोठ्या गटात स्वतंत्र गीतगायन स्पर्धा घेण्यात आली . विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या स्पर्धांमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला . आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री पावरा यांनी महात्माजींच्या आणि शास्त्रीजींच्या विचारांचा अनुनय करण्याचे आवाहन केले . आपल्या भाषणात त्यांनी गांधीजी आणि लालबहादूर जींच्या जीवनातील काही उदाहरणे दिलीत . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण भोई यांनी केले तर आभार श्रीमती भावना पाटील यांनी व्यक्त केलेत. या प्रसंगी दोन्ही विभागांचे मुख्याध्यापक, व्यवस्थापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमानंतर ''स्वच्छ भारत मिशन '' अंतर्गत शालेय आवारात साफ-सफाईची मोहीम राबविण्यात आली . 




No comments:

Post a Comment