दिनांक २८ सप्टेंबर २०१७ रोजी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा ,निमझरी येथे आज अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ''हस्तकला'' व विविध नित्यपयोगी वस्तूंची निर्मिती'' प्रशिक्षण " संपन्न झाले . एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे आणि ''आदिवासी सामाजिक विकास संस्था'' जव्हार यांचे संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला . जव्हार येथील ''आदिवासी सामाजिक विकास संस्थेच्या'' श्रीमती संगीता गुरव , कुमारी रश्मी मोरे व श्री हेमंत चौधरी यांनी इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले . या प्रशिक्षणात त्यांनी अगरबत्ती बनविणे , साबण बनविणे , सुगंधी द्रव्य निर्मिती, हॅन्ड वाश लिक्विड निर्मिती , खडू बनविणे , पेपर बॅग निर्मिती आदी बाबतीत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक कृतीत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी दिली . विद्यार्थ्यांनी स्वावलंबी ,आत्मनिर्भर व्हावे या उद्देशाने सदरहू संस्था कार्यरत असून धुळे प्रकल्पातील व राज्यातील इतर प्रकल्पातील सर्व आश्रमशाळांमध्ये ते हा उपक्रम राबवित आहेत.
प्रारंभी श्री जे .व्ही .गिरासे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांनी विविध कलागुण जोपासून आत्मनिर्भर होणेसाठी अशा उपक्रमापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री रितेश कुलकर्णी यांनी भूषविले . कार्यक्रमास उपशिक्षक श्री एस.एम. भलकार ,श्रीमती माधुरी गावित ,श्री जे.बी. मिस्तरी ,श्री प्रमोद निळे ,श्री एच .बी .साळवे , श्री वाघ , श्री चौधरी ,श्री गोकुळ थोरात ,श्री आर .बी . जाधव ,श्रीमती भावना पाटील ,श्री मनोज महाले ,श्री जी एम पाटील ,श्री जे .डी .जाधव ,श्री डी एस पावरा उपस्थित होते. प्रशिक्षण यशस्वी करणेसाठी श्री प्रमोद पाटील ,श्री बोरसे, श्री मधुकर मोरे ,श्री रमेश भिल यांनी परिश्रम घेतलेत .
प्रशिक्षणाचे अन्य फोटो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
No comments:
Post a Comment