Saturday, September 30, 2017

ए. पी. ओ . श्री वाडिले साहेबांची निमझरी शाळेस भेट !

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,धुळे येथील सहायक प्रकल्प अधिकारी श्री एस. टी . वाडीले साहेबांनी दिनांक २६ सप्टेंबर २०१७ रोजी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा ,निमझरी शाळेस भेट दिली. आपल्या सविस्तर भेटीत त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी हितगुज केले. शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. शाळेच्या कामकाजाविषयी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी त्यांनी समाधान  केले. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी भावी यशासाठी शुभेच्छा दिल्यात आणि यशाची परंपरा निरंतर चालू ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापक [माध्यमिक ] श्री पी .डी .पावरा व मुख्याध्यापक [प्राथमिक] श्री आर.एस. कुलकर्णी यांनी माननीय अधिकारी महोदयांचे स्वागत केले . 

No comments:

Post a Comment