आज दिनांक २९ जुलै २०१७ वार-शनिवार रोजी आर सी पटेल अनुदानित व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर ,निमझरी येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले . आरंभी उपशिक्षक श्री जे.व्ही. गिरासे यांनी विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीचे स्वरूप आणि महत्व विशद केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री पी. डी. पावरा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. उपशिक्षक श्री भलकार ,श्री चौधरी ,श्री राहसे ,श्री मिस्तरी,श्री निकुंभ,श्री भोई ,श्री वाघ ,श्रीमती गावित ,श्री निळे व श्री निळं यांचे मार्गदर्शनाखाली सदर क्षेत्रभेटीचे यशस्वी आयोजन संपन्न झाले. या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांनी स्थानिक पुजारी ,मंदिर समितीचे प्रमुख यांच्याशी चर्चा करून मंदिराचा इतिहास, बांधकामाचे स्वरूप, नित्यक्रम, वार्षिक उत्सव इ. माहिती प्राप्त केली. हरिपाठ तसेच वारकरी संप्रदाय विषयी विद्यार्थी मोठ्या उत्कंठतेने माहिती जाणून घेत होते.
"विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास'' हेच आमचे ध्येय ! या उद्देशानेच सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत दर्जेदार शिक्षणाचे दालन उपलब्ध व्हावे म्हणून १९९७ मध्ये निमझरी येथे माध्यमिक तर 2014 मध्ये उच्च माध्यमिक आश्रमशाळेची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून शाळेची आततागायत यशस्वी घौडदौड सुरु असून असंख्य विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यात आपला महत्वाचा वाटा शाळेनं उचललेला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
अनुदानित प्राथमिक , माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्री जयंती निमित्त ...
-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,धुळे येथील सहायक प्रकल्प अधिकारी श्री एस. टी . वाडीले साहेबांनी दिनांक २६ सप्टेंबर २०१७ रोजी अनुदानित प्रा...


