दिनांक २२ सप्टेंबर २०१७ रोजी संस्थांतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांतर्गत शालेय स्तरीय सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांच्या 'गृहकार्य' व 'वर्गकार्य' असणाऱ्या वह्यांची संस्थास्तरीय नियुक्त समिती मार्फत तपासणी करण्यात आली. सदर समितीत मुख्याध्यापक श्री आर.बी. भदाणे ;श्री आर .बी .पाटील आणि श्री गोसावी यांचा समावेश होता. समितीमार्फत इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या सर्व वह्यांची पुनर्तपासणी करण्यात आली. शाळेत सदर कार्य नियमित आणि नीटनेटके केले जाते तसेच मुख्याध्यापकांकडून नियमित आढावा घेतला जातो याबद्दल समितीने समाधान व्यक्त केले. दि शिरपूर एज्युकेशन सोसायटी मार्फत हा उपक्रम दरवर्षी नियमित पणे राबविला जात असतो . समितीत समाविष्ठ मुख्याध्यापक त्रयीनीं इयत्ता दहावी आणि बारावीच्या वर्गांना सदिच्छा भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
"विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास'' हेच आमचे ध्येय ! या उद्देशानेच सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत दर्जेदार शिक्षणाचे दालन उपलब्ध व्हावे म्हणून १९९७ मध्ये निमझरी येथे माध्यमिक तर 2014 मध्ये उच्च माध्यमिक आश्रमशाळेची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून शाळेची आततागायत यशस्वी घौडदौड सुरु असून असंख्य विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यात आपला महत्वाचा वाटा शाळेनं उचललेला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
आद्य क्रांतिवीर शूरवीर उमाजी नाईक जयंती च्या दिवशी आश्रम शाळा, निमझरी येथे प्रतिमा पूजन आणि व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील जेष...
-
आर.सी.पटेल अनुदानित प्राथमिक ,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा ,निमझरी ता:शिरपूर येथे ९ ऑगस्ट २०१७ रोजी ''विश्व आदिवासी गौरव दि...

No comments:
Post a Comment