Friday, September 22, 2017

.आर सी पटेल अनुदानित व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर ,निमझरी येथे क्षेत्रभेट !

आज दिनांक २९ जुलै २०१७ वार-शनिवार रोजी आर सी पटेल अनुदानित व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर ,निमझरी येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले . आरंभी उपशिक्षक श्री जे.व्ही. गिरासे यांनी विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीचे स्वरूप आणि महत्व विशद केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री पी. डी. पावरा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. उपशिक्षक श्री भलकार ,श्री चौधरी ,श्री राहसे ,श्री मिस्तरी,श्री निकुंभ,श्री भोई ,श्री वाघ ,श्रीमती गावित ,श्री निळे   व श्री निळं यांचे मार्गदर्शनाखाली सदर क्षेत्रभेटीचे यशस्वी आयोजन संपन्न झाले. या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांनी स्थानिक पुजारी ,मंदिर समितीचे प्रमुख यांच्याशी चर्चा करून मंदिराचा इतिहास, बांधकामाचे स्वरूप, नित्यक्रम, वार्षिक उत्सव इ. माहिती प्राप्त केली. हरिपाठ तसेच वारकरी संप्रदाय विषयी विद्यार्थी मोठ्या उत्कंठतेने माहिती जाणून घेत होते.


No comments:

Post a Comment